कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट

भारतीय क्रांतिवीरांनी चेतविलेल्या बलिदानाचा इतिहास सर्व दूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या धर्मादाय संस्थेची स्थापना ठाणे येथे २००० साली झाली.

परिचय

ही संस्था म्हणजे चंद्रकांत शांताराम शहासने, यांनी पन्नास वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाची पूर्ततेकडे चाललेली यशस्वी वाटचाल असेच म्हणावे लागेल.

संकल्प :

१) भारतीय क्रांतिवीरांनी चेतविलेल्या बलिदानाच्या ज्योतीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.

२)राष्ट्रभक्ती, आरोग, पर्यावरण, निसर्गोपचार साक्षरता प्रसारातून सुदृढ व व्यसनमुक्त समाज निर्मिती करणे.

३) यासाठी विविध शिबिरे, परिक्रमा , संस्कार वर्ग, राष्ट्रभक्ती साहित्य संमेलने, कवी संमेलने, आपत्ती व्यवस्थापन कार्याचे आयोजन करणे.

४) देशभक्तांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शाळा शाळांमधून प्रदर्शित करणे, मुलांना संस्कारीत करणे.

५) राष्ट्र पुरुषांची चित्रे चरित्रे यांचे  प्रकाशन करणे. नाममात्र किंमतीत शक्य तेथे विनामूल्य पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे