आमच्याबद्दल
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय..
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १९५० अंतर्गत नोंदवलेली आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता, बंधुभाव आणि देशभक्ती या नैतिक मूल्याचा प्रसार समाजात करणे हे संस्थेचे ध्येय आहे.
सदर ट्रस्ट विविध उपक्रम राबवते जसे
- शिक्षण, कला, साहित्य आणि भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देणे.
- शालेय विद्यार्थ्यांत देशभक्ती, राष्ट्रीय ऐक्य, देशप्रेम, चारित्र्य बांधणी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी कार्यक्रम राबवणे
- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण आणि शैक्षणिक साहित्याची मदत करणे
- राष्ट्र उभारणीस पूरक ठरतील अशी साहित्य संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, जागरूकता उपक्रम, चर्चासत्रे, प्रदर्शने, प्रशिक्षणे आयोजित करणे
- आरोग्य आणि आरोग्य जागृती शिबिरे, कपडे गोळा करण्यासाठी शिबिरे, आपत्ती व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे
- ट्रस्टच्या उद्देशांना पूरक माहिती प्रसिद्ध करून तिचा प्रचार करणे
- नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत मदतीची तजवीज करणे
- वृद्धाश्रम, महिलाश्रम, अनाथालये, विकलांग केंद्रे स्थापन करणे
- न्यासाच्या उद्दीष्टांस पूरक शासकिय योजना राबवणे, देणग्यांचा योग्य वापर करणे आणि समान उद्दीष्ट असलेल्या संस्थांना मदत करणे
- लहान मुलांना देशप्रेम आणि देशभक्तीचे धडे देऊन सुसंस्कृत नागरिक बनवण्याच्या हेतूने गेली २० वर्षे कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट सामाजिक कार्याच्या क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने काम करत आहे.
- कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टला दिलेल्या देणग्या ८० जी अंतर्गत करसवलतीस पात्र आहेत.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय...
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट शालेय विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेऊन, त्यांना समजेल, रस वाटेल अशा सोप्या भाषेत भारतीय स्वातंत्र्यलढा आणि इतर प्रेरणादायी गोष्टींची पुस्तके छापते. हीच बाब कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टला इतर संस्थांपेक्षा वेगळं ठरवते. वैश्विक शांती, सुसंवाद आणि स्थैर्यासाठी मानवतावादी दृष्टीकोन आणि नीतीमूल्य असलेला समाज अत्यावश्यक आहे. यासाठी लहान मुलांमधे हे गुण विकसीत करून त्यांना सुजाण नागरिक बनवणे हे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे उद्दीष्ट आहे. ट्रस्ट सन २००० पासून कार्यरत आहे. ट्रस्टने केलेली कामे खालील प्रमाणे
- शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी, चारित्र्यसंवर्धन, राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता, बंधुभाव आणि देशभक्ती या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्या विषयांवरील पुस्तके, नियतकालिके प्रकाशित करण्याचे काम कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट करते. या अंतर्गत आतापर्यंत ४०हून अधिक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. यासाठी ट्रस्टचे स्वत:चे प्रकाशन आहे.
- प्रदर्शने, चर्चासत्रे आणि साहित्य संमेलने- राष्ट्रउभारणी आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासाचा प्रसार हे उद्देश समोर ठेऊन निरनिराळी प्रदर्शने, चर्चासत्रे, साहित्य संमेलने आयोजित करते. भारतिय स्वातंत्र्य लढ्याची सचित्र माहिती या प्रदर्शनांतून मांडली जाते.
- २०१८ पासून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आयोजित करत आहे. ‘पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे’ ही या संमेलनामागची प्रमुख संकल्पना आहे. या संमेलनाच्या निमित्ताने विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी पुस्तके प्रकाशित केली जातात. यासाठी न्यासाला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे २०१८ व २०१९साली अनुदानही मिळालेले होते..
- सन २०१८, २०१९, २०२०,२०२१,२०२२, २०२३,२०२४ प्रतिवर्षी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण, राष्ट्रीय आरोग्य आणि राष्ट्रभक्ती, सैनिकीकरण अशा संकल्पना घेऊन ७ राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आमचे ध्येय: नवीन पिढीत राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये आणि पर्यावरण जागृती निर्माण करणे
- राष्ट्रनिर्मीतीचा...
पर्यावरण जनजागरण, वृक्षसंवर्धन व आरोग्य साक्षरता व निसर्गोपचार मोहीम
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. २०२१ या वर्षीच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, वृक्षसंवर्धनाविषयी जनसामान्यांमध्ये जागृतता निर्माण व्हावी या हेतूने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने खास मोहीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, दृक-श्राव्य माध्यमातून राबविण्यात आली
- मोहिमेतील उपक्रम स्वरूप: - सहभागी स्वयंसेवकाने कुठलेही १ रोप लावावे आणि या रोपासमवेत २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ बनवून दिलेल्या व्हॉट्सअप फोन क्रमांकावर पाठवावा. जास्तीत जास्त व्हिडिओजना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या माध्यमातून केला जाईल.
-
खालील आशयाचा विडिओ बनविण्यांत यावा. सहभागी स्वयंसेवकांनी विडिओ सुरुवात करताना स्वतःचे पूर्ण नाव सांगून त्यानंतर उपक्रमाविषयी म्हणजेच कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वृक्ष-संवर्धन प्रसार उपक्रमांतर्गत हा विडिओ बनवत असल्याचे नमूद करावे. तसेच स्वतःविषयी अथवा संलग्न संस्थेविषयीचा इतर तपशील ( सहभागी संस्थांनी ठरविणे), रोपाचे नाव आणि त्याविषयीची माहिती सांगावी. हि माहिती सांगितल्यावर खालील संकल्प रेकॉर्ड करावा.
संकल्प: "प्राणवायू मिळावा, वातावरण शुद्ध राहावे, जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण यावे आणि पर्यावरणाचा सर्वांगीण समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आणि वाढविणे गरजेचे आहे म्हणूनच, वृक्षारोपणासह, वृक्ष-संवर्धन आणि पर्यावरण-रक्षण हीदेखील राष्ट्रभक्ती आहे हे मला पटलेले आहे. या जाणिवेतून मी आज १ रोप लावलेले आहे. दिनांक ५. ०६. २०२१ रोजी असणाऱ्या पर्यावरण-दिनाच्या निमित्ताने मी संकल्प करीत आहे कि, मी लावलेल्या रोपाचे मी संगोपन करणे हि माझी जबाबदारी आहे आणि मी ती व्यवस्थित पार पाडणार आहे. याची जाणीव म्हणून, या रोपाचे संगोपन करताना मला आलेल्या अनुभवांचा विडिओ मी पुढील वर्षी करणार आहे. आणि तो कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टकडे जागृती-प्रसारासाठी पाठविणार आहे. झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण वाचवा आणि पर्यावरणसंतुलनासाठी मदत करा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट च्या या उपक्रमात आपणही सहभागी व्हा." - व्हिडीओ पाठवण्याची अंतिम दिनांक ४. ०६. २०२१ अशी होती .या उपक्रमास विद्यार्थी -विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
- कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टची...
पर्यावरण जनजागरण, वृक्षसंवर्धन व आरोग्य साक्षरता व निसर्गोपचार मोहीम
वृक्षसंवर्धनाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत- जास्त व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी व्हावे. विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच संस्थेमधील कर्मचारी वर्ग यांनी या उपक्रमामध्ये भरभरून सहभागी असेही आवाहन करण्यात आले होते.
यासोबतसंस्थेचे चंद्रकांत शहासने
लिखित, पर्यावरण, आरोग्य साक्षरता, निसर्गोचार विषयक एका लेखाचे प्रसारण दिनांक ५जुन २०१९ पासून प्रसारमाध्यमांवर दररोज करण्यात आले. हे प्रसारण ११ सप्टेंबर म्हणजेच व वनहुतात्मादिनापर्यंत करण्यात आले. या सर्व लेखांचे पर्यावरण विचार या नावाचे पुस्तक महाराष्ट्राचे महामहीम भगतसिंहजी कोश्यारी यांच्या शुभहस्ते ११ सप्टेंबर २०१९ रोजी प्रकाशित करण्यात आले.
वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून मान्यवर
- विकासजी खारगे IAS सचिव
- डॉ. बबन जोगदंड
- श्री महादेव जयराम तथा आप्पा जोशी
- दिलीप त्र्यंबक शेलवंटे
- नागेश कल्याणकर
- पराग श्रीपतराव मते
- प्रितम जनार्दन म्हात्रे
- गोरख दगडे पाटील
- पुंडलीक थोटवे
- जयसिंग रंगनाथ जवक
या मान्यवर व्यक्तींना महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभास कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मंजिरी शहासने, डॉ.चंद्रकांत शहासने, ऍड. नंदिनी शहासने तसेच मार्गदर्शक श्री रंगनाथजी नाईकडे IFS हे हजर समारंभाचे सूत्रसंचालन व निवेदन तेजाली शहासने यांनी केले.

विश्वस्त, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट
- समाजसेवेसाठी आजच सहभागी व्हा
अभिप्राय
अजिंक्य लोखंडे
सर्व छायाचित्रांकडे पाहून मनात भारताचा सर्व इतिहास जागा झाला. या क्रांतिकारकांच्या बलिदानाचे भान ठेवून आपणही देशासाठी काही करावं ही भावना मनात जागृत झाली. असे प्रदर्शन बनवल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद !
डॉक्टर संजय पोहनकर
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आयोजित केलेली सदर प्रदर्शनी निश्चितच प्रेरणादायी आणि प्रशासकीय आहे
डॉक्टर मधुमती वानखेडे
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेले प्रदर्शन अतिशय उपयुक्त. छायाचित्रांकडे पाहून संपूर्ण इतिहास आठवतो. आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. प्रत्येक छायाचित्र क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण करून देतात. आपल्या प्रदर्शनाकरता भविष्यात काही मदत हवी असल्यास कळवावे स्वागत आहे. आपल्या पुढच्या उपक्रमाला शुभेच्छा
आमच्याशी संपर्क साधा
